धरणगावच्या व्यापार्‍याकडील 11 लाख लूटले : धुळ्यातील पाच आरोपी जाळ्यात

धुळे स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कामगिरी : सात लाखांची रोकड जप्त


धुळे  : शहराजवळील फागणेनजीक धरणगावातील व्यापार्‍याच्या दुचाकीला लाथ मारून डिक्कीतील सुमारे 11 लाख रुपये लूटण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर धुळे गुन्हे शाखेने पाच आरोपींना गजाआड केले आहे. आरोपींकडून सहा लाख 84 हजाराची रोकड जप्त करण्यात आली.

असे आहे लूट प्रकरण
नागपूर-सुरत महामार्गावर धुळे तालुक्यातील फागणे गावाजवळ 18 जुलै रोजी मुनीम किशोर पंढरीनाथ पाटील व त्यांचे मित्र अतुल लक्ष्मीनारायण काबरा हे धुळ्यातील श्री रत्न ट्रेडींगमध्ये सोयाबीन विक्रीसाठी आले होते व सोबत सोयाबीन विक्रीची रक्कम 10 लाख 91 हजार रुपये दुचाकीच्या डिक्कीत ठेवून ते दुचाकी (एम.एच.19 बीई 1807) ने निघाले होते. यावेळी फागणे गावाबाहेर आल्यानंतर ते अमळनेर रस्त्याकडे वळले. यावेळी दोन तरुण दुचाकीवरून आल्यानंतर एकाने तू माझ्या बहिणीचे नाव का घेतले, असे कारण सांगून धमकावण्यास सुरुवात केली तर दुसर्‍या तरुणाने व्यापार्‍यांच्या दुचाकीला लाथ मारून त्यांना खाली पाडले. यानंतर दुचाकीच्या डिक्कीमधील रोकड घेऊन संबंधित तरुण पळून गेले. या घटनेत खाली पडल्यामुळे व्यापार्‍याच्या डोळ्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली या संदर्भात त्याने तातडीने धुळे तालुका पोलीस ठाण्यात संपर्क करून गुन्हा दाखल केला.






गुन्हे शाखेकडून गुन्ह्याची उकल
धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी जे.बी.रोड ते घटनास्थळापर्यंतचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले असता पांढर्‍या रंगाची अ‍ॅसेस मोपेड मोटारसायकलवर दोन तरुण जातांना दिसल्यानंतर त्यांनी धुळ्यातील श्री रत्न ट्रेडींग येथील कामास असलेला तरुण यश विश्वनाथ ब्रम्हे (22, रा. पवननगर, चाळीसगावरोड, धुळे) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याची खोलवर विचारपूस केल्यानंतर त्याने सहकार्‍यांसोबत केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.

पाच आरोपींना अटक
आरोपी यश विश्वनाथ ब्रम्हे (22, रा.पवननगर, चाळीसगावरोड, धुळे), चंद्रकांत रवींद्र मरसाळे (21, रा.मनोहर टॉकीजच्या मागे, धुळे), कल्पेश शाम वाघ (रा. पवन नगर हुडको, चाळीसगावरोड), राहुल शाम वाघ (26, रा.पवन नगर, हुडको), सनी संजय वाडेकर (28, रा.मनोहर टॉकीजच्या मागे, धुळे) या पाच आरोपींना अटक केली तर संशयीत राहुल अनिल नवगिरे (पवननगर, चाळीसगावरोड, धुळे) हा पसार झाला आहे. आरोपी यशने व्यापारी श्री रत्न ट्रेडींगमधून सोयाबीन विक्रीची रक्कम घेवून धरणगावकडे जाण्यास निघाल्यानंतर संशयीत राहुल नवगिरे यास त्याच्या मोबाईलवर ‘एक घोडा दो दुल्हे निकल गये’ असे कोडवर्डच्या माध्यमातून सांगितल्यानंतर पाच संशयीत वेगवेगळया दुचाकींवर ठिकठिकाणी थांबून तक्रारदाराचा पाठलाग करीत असल्याचे समोर आले आहे.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
हा गुन्हे धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, धुळे तालुक्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, गुन्हे शाखेचे एपीआय श्रीकृष्ण पारधी, संजय पाटील, पंकज खैरमोडे, शशिकांत देवरे, रवीकिरण राठोड, सुशील शेंडे, निलेश पोतदार, गुणवंत पाटील व धुळे तालुका पोलीस स्टेशनचे किशोर खैरनार, कुणाल पानपाटील, उमेश पवार, विशाल पाटील आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !