जळगाव तालुक्यातील तरुणीवर अत्याचार


Abuse of young woman in Jalgaon taluka जळगाव : इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर वाढलेल्या संबंधाचा फायदा घेत तरुणीवर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी 23 वर्षीय पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार नशिराबाद पोलीस ठाण्यात संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीत तरुणी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहे.

वेळोवेळी केला अत्याचार
संशयिताने या तरुणीशी सोशल मीडियाच्या इन्सटाग्रामवर ओळख केली. त्यानंतर माहे जुलै ते 10 जुलै दरम्यान नाशिक तसेच पीडितेच्या घरी वेळोवेळी जाऊन तिच्या संमतीविना जबरीने अत्याचार केला. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीनुसार विक्की गुलाब सोनवणे (रा.कला वसंतनगर) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे तसेच सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी घटनास्थळी जावून पीडितेकडून माहिती घेतली. तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड हे करीत आहेत.


कॉपी करू नका.