पीजे रेल्वे मार्गासाठी 300 तर धुळे-नरडाणा मार्गासाठी 350 कोटींची तरतूद

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती : महाराष्ट्राला 15 हजार 554 कोटींची तरतूद


 

300 crores for PJ railway line and 350 crores for Dhule-Nardana line भुसावळ : केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 च्या बजेटमध्ये महाराष्ट्राला विक्रमी 15 हजार 554 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती रेल्वे, संचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. दिल्ली आणि महाराष्ट्रातील (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) प्रसार माध्यमांना बुधवारी त्यांनी संबोधीत केले. पीजे रेल्वे मार्गासाठी 300 तर धुळे-नरडाणा मार्गासाठी 350 कोटींची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्याला 13 पट अधिक निधी
महाराष्ट्राला प्रति वर्ष दिल्या जाणार्‍या सरासरी 1,171 कोटी रुपयांच्या वाटपाच्या जवळपास 13 पट निधी देण्यात आल्याचे रेल्वे मंत्रभ म्हणाले. या प्रसंगी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव, पीएचओडी आणि मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूरचे इतर विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि महाराष्ट्रातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्यांच्या संबंधित मुख्यालयात उपस्थित होते. भुसावळ विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक ईती पाण्डेय, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुनील कुमार सुमन आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

भुसावळ विभागासाठी भरीव तरतूद
भुसावळ विभागातील धुळे (बोरविहीर)-नरडाणा या 50.6 किमीमीटर लांबीच्या रेल्वे लाईनसाठी 350 कोटी रुपये तसेच पाचोरा-जामनेर या 84 किलोमीटर अंतराच्या लाईनच्या गेज रुपांतरणासाठी 300 कोटींची तरतूद करण्यात आली. मनमाड-जळगाव तिसर्‍या रेल्वे लाईनीसाठी 120 कोटी रुपये तर जळगाव-भुसावळ चौथ्या लाईनसाठी 40 कोटी रुपयांची तरतूद तसेच भुसावळ-बडनेरा साइड ट्रेनसाठी वेगळी अप आणि डाउन मुख्य लाईन, अप दिशेने अतिरिक्त द्वीप प्लेटफामसाठी 11 कोटी रुपये तसेच निफाड आरओबीसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इ

 


कॉपी करू नका.