भुसावळातील ‘अमृत’ च्या टप्पा दोनमध्ये 137 कोटींच्या प्रस्तावाला प्रशासकिय मान्यता

आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याला यश


137 crores proposal for phase two of ‘Amrit’ in Bhusawal has been approved by the administration भुसावळ : शहरासाठी मंजूर असलेल्या अमृत योजनेच्या टप्पा दोनच्या प्रस्तावाला आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याने मंजुरी मिळाली असून आता रखडलेल्या योजनेला गती मिळण्याची आशा आहे. अटल मिशन फार रेजुवेनशन एंड अर्बन ट्रांसफार्मेशन अर्थात अमृत योजना टप्पा दोनच्या संदर्भात 16 जुलै रोजी मुंबईतील मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत राज्यस्तरीय तांत्रिक समितीने भुसावळातील योजनेबाबत चर्चा केली. यावेळी अमृतच्या टप्प्या दोनच्या 136 कोटी 77 लाख रुपयांच्या प्रस्तावाला राज्य शासनाने तांत्रिक समितीने मंजुरी दिली.

वाढीव पाईप लाईनसह ही कामे होणार
अमृतच्या दुसर्‍या टप्प्यातील 136 कोटींच्या निधीतून शेळगाव बॅरेजमधील जॅकवेल उभारणी, जलशुध्दीकरण केंद्र उभारणी, जॅकवेलपासून जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत 10 किलोमीटर अंतराची 800 मीमी व्यासाची पाईपलाईन, 150 किलोमीटरची वाढीव पाईपलाइन, पंचशील नगरातील 12 लाख लीटरचा एक जलकुंभ आदी कामे होतील. दरम्यान, अमृत योजनेच्या टप्पा एकची कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत त्यामुळे जलकुंभाची शंभर टक्के कामे पूर्ण व्हावीत, अशी शहरवासीयांना आशा आहे. अमृत योजना टप्पा एकच्या 98 कोटींच्या कामांना 26 ऑक्टोबर 2017 रोजी ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिल्यानंतर 24 महिन्यात अर्थात 25 ऑक्टोंबर 2019 पर्यंत मुदत शहरात टप्पा एकचे काम अद्यापही पूर्ण झालेच नाही.

निरंतर पाठपुराव्याला आले यश : आमदार संजय सावकारे
अमृत योजनेत अनेक किचकट प्रक्रिया असून निरंतर पाठपुरावा केल्यानंतर मंजुरी मिळाली आहे. शहरातील पाणीप्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. राज्य शासनाकडून अमृत टप्पा दोनच्या प्रस्तावाला यापूर्वी तांत्रिक व शिखर समितीची मंजूरी मिळाली आहे. आता राज्यस्तरीय समितीची प्रशासकिय मंजुरी मिळाल्याने पुढील प्रक्रियेसह कामांना लवकरच सुरूवात होईल, असे आमदार संजय सावकारे ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना म्हणाले.


कॉपी करू नका.