मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई : 22 लाखांचा गुटखा जप्त


मुक्ताईनगर : मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना गुटखा तस्करीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निदेर्शश दिल्यानंतर स्कॉर्पिओ वाहनातून तब्बल 22 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. या कारवाईने गुटखा तस्कर हादरले आहेत. अजीज शेख बाबू शेख (रा. झांसी नगर, रिसोड, जिल्हा वाशिम) या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मुक्ताईनगर-बर्‍हाणपूर रोडवरील स्मशानभूमीजवळ पथकाने वाहनांची तपासणी सुरू केल्यानंतर स्कॉर्पिओ (क्रमांक एम.एच. 27 डी.एल.2496) आल्यानंतर तिच्यात 22 लाख 38 हजार 50 रुपयांचा अवैध गुटखा व तंबाखू आढळली. वाहन चालक अजीज शेख बाबू शेख (36, रा.झांसी नगर, रिसोड, जिल्हा वाशिम) याला अटक करीत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई मुक्ताईनगर डीवायएसपी राजकुमार शिंदे व पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक राहुल बोरकर, राजेंद्र खनके, छोटू वैद्य, देवसिंग तायडे, विशाल सपकाळे व निखील नारखेडे आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.