26 हजारांची लाच भोवली : अक्कलकुवा बीडीओंसह दोघे नंदुरबार एसीबीच्या जाळ्यात


26 thousand bribe: Akkalkuwa BDO and two in Nandurbar ACB’s net अक्कलकुवा : ईमारत कामाच्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी 26 हजारांची लाच मागून ती स्विकारताना अक्कलकुवा, जि.नंदुरबार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय लोंढे (39) व सहाय्यक लेखाधिकारी वींद्र सुखदेव लाडे (47) यांना नंदुरबार एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली. लाचखोरांविरोधात अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे लाच प्रकरण
32 वर्षीय तक्रारदाराने पंचायत समिती अक्कलकुवा व ग्रामपंचायत डाब अंतर्गत एकूण तीन अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण केले आहे. तिन्ही कामांच्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तक्रारदाराने रवींद्र लाडे यांच्याकडे पाठपुरावा केल्याने एका कामाचे बिल दोन लाख 46 हजार 850 रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यात आले मात्र बिल काढून दिल्याचा मोबदला व उर्वरित दोन बिलांची रक्कम काढण्यासाठी आठ हजारांची मागणी केली तसेच बीडीओ यांच्यासाठी 18 हजार रुपये मागितले. तक्रारदाराने नंदुरबार एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला व लाडे यांनी लाच स्वीकारताच बीडीओ यांनाही अठक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
नंदुरबार एसीबीचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी, हवालदार विलास पाटील,
हवालदार विजय ठाकरे, नाईक देवराम गावीत, नाईक हेमंत कुमार महाले, नाईक सुभाष पावरा, नाईक नरेंद्र पाटील, नाईक जितेंद्र महाले आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


कॉपी करू नका.