जळगावात मारहाण करत दोघांनी तरुणाला लुटले

भरदिवसा दुपारची घटना ; पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांची धाव


जळगाव : दोघे मित्र गप्पागोष्टी करत असताना दोन इसम त्यांच्याजवळ आले. त्यानंतर दोघांनी एकाला मारहाण केली. त्यांच्याकडील चांदीचे दागिने तसेच मोबाईल असा मुद्देमाल जबरीने हिसकावून नेला. सोमवार, 22 रोजी दुपारी तीन वाजता शहरातील नेक्सा शोरुमच्यापाठी मागे भोलेबाबा मंदीर कुटीया जवळ घडली. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मंगळवार,23 रोजी रात्री 10.33 वाजता गुन्हा दाखल झाला.

असे आहे लूट प्रकरण
समीर कमरोद्दीन शेख (23, रा.जोशीवाडा, मेहरुण ,ह.मु.ममता बेकरीजवळ सुप्रीम कॉलनी) हे रस्त्याने जात असताना त्यांचे मित्र डुबर्‍या ( सुप्रीम कॉलनी) हे भेटले. नेक्सा शोरुमच्या पाठीमागील भोलेबाबा मंदीर कुटीयाजवळ उभे राहुन दोघे गप्पागोष्टी करु लागले. त्याठिकाणी दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. समीर शेख यांना दोघा संशयितांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या अचानक झालेल्या प्रकाराने दोघे मित्र हादरले. दोघे काही विचारतील त्यापूर्वीच संशयितानी समीर शेख या तरुणाकडील चांदीचे दागिने हिसकावून पोबारा केला. तरुणाच्या तक्रारीनुसार दाखल गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार संजय पाटील हे करीत आहेत.

असा नेला मुद्देमाल
नऊ हजार किंमतीचा मोबाईल, दोन हजार किंमतीची 26 ग्रॅम वजनाची चांदीची चैन, त्यात पँडल, हिरव्या रंगाचा राशीचा खडा, 1500 रुपये किंमतीचे 20 ग्रॅम वजनाच्या लाल, निळ्या व पांढरा रंगाचे खडे असलेल्या तीन चांदीच्या अंगठ्या, 100 रुपये किंमतीची दोन ग्रॅम वजनाची चांदीची कानातील बाळी मिळून 12 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेण्यात आला.


कॉपी करू नका.