तुझा कार्यक्रम करायचा आहे म्हणत जळगावात तरुणावर चॉपरने हल्ला


जळगाव : तुझा कार्यक्रम करायचा आहे, असा दम भरत तरुणावर चॉपरने वार करण्यात आला. या घटनेत विद्यार्थी जखमी झाला. सोमवार, 22 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास रायपुर, कुसुंबा परिसरात शिवम प्रोव्हीजनजवळ रस्त्यावर ही घटना घडली.

असे आहे हल्ला प्रकरण
22 वर्षीय विद्यार्थी रायपुर येथे कुटुंबासह वास्तव्यास आहे. तो महाविद्यालयीन शिक्षण घेतो. गावातील दोन संशयितांनी या विद्यार्थ्याला तुझा कार्यक्रम करायचा आहे, असे म्हणत चॉपरने वार केला. या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या उजव्या हाताच्या बोटांना, डाव्या हाताच्या बोटाला जखमा झाल्या. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांनी घटनास्थळी जावून प्रकाराची माहिती घेतली.

या प्रकरणी विद्यार्थ्याच्या तक्रारीनुसार मंगळवार,23 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात राजकिरण मानसिंग परदेशी, दुर्गेश कैलास परदेशी ( दोन्ही रा. रायपुर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गफार तडवी हे करीत आहेत.


कॉपी करू नका.