50 हजारांची लाच भोवली : भडगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी जळगाव एसीबीच्या जाळ्यात


50 thousand bribe : Bhadgaon police station staff in Jalgaon ACB’s net भडगाव : वाळू वाहतूक सुरळीत सुरू राहू देण्यासाठी व कुठलीही कारवाई न करण्यासाठी दोन लाख 60 हजारांची लाच मागून त्यातील पहिल्या हप्त्यापोटी 50 हजारांची लाच स्वीकारणार्‍या भडगाव पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍याला जळगाव एसीबीने अटक केली आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता झालेल्या कारवाईने जळगाव जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. किरण रवींद्र पाटील (41) असे अटकेतील लाचखोर हवालदाराचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
भडगाव शहरातील 28 वर्षीय तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर यापूर्वी भडगाव पोलिसात अवैध वाळू वाहतूकी संदर्भात दोन गुन्हे दाखल आहे. तक्रारदार यांना सुरळीत वाळू वाहतूक करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी 25 रोजी आरोपी हवालदाराने दोन लाख 60 हजारांची लाच मागितली होती व याबाबत एसीबीकडे तक्रार केल्यानंतर पडताळणी करण्यात आली. लाचेतील पहिला हप्ता म्हणून तडजोडीअंती पंचासमक्ष 50 हजार रुपये घेताना हवालदार किरण पाटील यास शुक्रवारी सकाळी 10 वाजता अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


कॉपी करू नका.