मुक्ताईनगरात कचरा संकलनाला ‘खो’ ; सेना प्रमुखांनी स्वखर्चाने लावले वाहन
मुक्ताईनगर : नगरपंचायत कचरा संकलन करण्यास सपशेल अपयशी ठरल्याने नागरीकांच्या घरात प्रचंड कचरा साचल्यामुळे नगरपंचायतीविषयी तीव्र रोषाचे वातावरण असतानाच समस्यांची जाण ठेवत शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना गटनेते राजेंद्र हिवराळे व नगरसेवक संतोष सुपडू मराठे व नगरसेविका सविता सुभाष भलभले यांनी आपापल्या प्रभाग क्र 12, 14 व 17 मध्ये कर्तव्य म्हणून स्वखर्चाने कचरा संकलन करणारे वाहन सुरू करून नगारीकांना दिलासा दिला आहे. शहरात कचरा न उचलल्यामुळे प्रचंड संतापाची लाट आहे मात्र याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प का ? याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहे.