स्वयंमप्रकाश दासजी सावदा स्वामी नारायण मंदिराचे नवे कोठारी


फैजपूर : सावदा येथील पुरातन जागृत श्री स्वामी नारायण मंदिराच्या नूतन कोठारीपदी शास्त्री स्वामी स्वयंमप्रकाश दासजी यांची नियुक्ती करण्यात आली. अ.नि.खान्देशरत्न शास्त्री भक्ती किशोरदासजी यांची नुकतीच हृदयविकाराने देवाज्ञा झाल्यानंतर रिक्त जागी त्यांचे वारसदार म्हणून शास्त्री स्वयंप्रकाश दासजी यांची निवड वडताल संस्थान प्रशासनाने केली.

निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
या नियुक्तीबद्दल स.गु.शास्त्री धर्म प्रसाददासजी, स.गु.शास्त्री भक्ती प्रकाशदासजी, भक्ती स्वरूपदासजी, शास्त्री धर्म प्रकाशदासजी, शास्त्री अनंत प्रकाशदासजी, शास्त्री लक्ष्मीनारायण दासजी, स्वामी सत्यप्रकाश दासजी, शास्त्री जगत प्रकाशदासजी, मंदिराचे विश्वस्त डॉ.अजितकुमार पाटील, नंदू पाटील, कानडे, फैजपूर स्वामी नारायण मंदिराचे विश्वस्त सुधीर चौधरी, कोठारी प्रशांत गाजरे, पी.डी.पाटील, समस्त खान्देश संत परिवार, गुरुकुल, सावदा, फैजपूरसह पंचक्रोशीतील संत-महंत यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. भगवान श्री स्वामी नारायण यांना अभिप्रेत असलेले धार्मिक राष्ट्र समाज प्रबोधनच कार्य तसेच मंदिराचे विकास कार्य वरिष्ठ मंडळी व भाविकांच्या सहकार्याने यशस्वीपणे पेलू, असा विश्वास नवे कोठारी स्वयंप्रकाश दासजी यांनी व्यक्त केला.


कॉपी करू नका.