साडेतीन लाखांचे 50 हरवलेले मोबाईल रावेर पोलिसांनी शोधले


रावेर : रावेर पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या तीन वर्षांपासून नागरिकांचे मोबाईल हरवण्याचे प्रमाण वाढले होते. याबाबत संबंधित मोबाईल धारकांनी तक्रार दाखल केल्या होत्या. याबाबत पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत साडे तीन लाखांचे 50 मोबाईल शोधले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या तांत्रिक विश्लेषणाची मदत घेऊन रावेर पोलिसांनी मागील तीन वर्षांपासून हरवलेले मोबाईल शोधण्यात यश मिळवले आहे. हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकाला परत दिले जाणार आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्व मोबाईल शोधण्याचे काम कॉन्स्टेबल सचिन घुगे यांनी केले.

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मोबाईल वितरण
पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी वेवोतोलु केजो, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक फैजपुर अन्नपूर्णा सिंह, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या हस्ते मोबाईल फोन नागरिकांना परत करण्यात आले.


कॉपी करू नका.