बोदवड शहरात 15 किलो प्लॅस्टीक जप्त


बोदवड : बोदवड शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुचनेनुसार नगरपंचायतीच्या पथकाने शहरातील 28 दुकानांची 25 ते 30 दरम्यान तपासणी करीत 15 किलो प्लॅस्टीक जप्त केले.

कारवाईने उडाली खळबळ
बोदवड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेचे पथक प्रमुख आकाश घुगे, शहर समन्वयक अंकित चौधरी, मनोज छपरीबंद, अर्जुन सारवान, संजय पालवे आदी कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले. आतापर्यंत 28 दुकानांवर कार्यवाही करीत 15 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आल्याचे नगरपंचायतीने कळवले आहे.


कॉपी करू नका.