चाळीसगावात रविवारी परदेशी, राजपुत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


भडगाव : चाळीसगाव येथील परदेशी, राजपुत समाज उन्नती मंडळाची यावर्षाची आमसभा संस्थेचे अध्यक्ष भरतसिंग देवचंद छानवाळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. ही आमसभा िविवार, 28 रोजी रविवारी दुपारी 12 वाजता राजपुत मंगल कार्यालयात लक्ष्मीनगर चाळीसगाव येथे आयोजीत करण्यात आलेली आहे. या आमसभेत मागील वार्षिक सभेचे प्रोसेंडींग वाचुन मंजुर करणे यासह विविध विषयांवर सभा होणार आहे. तसेच या आमसभेत परदेशी, राजपुत समाजातील गुणवंत, विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचा सन्मान उपस्थित मान्यवर व संचालक मंडळामार्फत करण्यात येणार आहे.

गुणवंतांना कागदपत्रे पाठवण्याचे आवाहन
इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी परीक्षेमध्ये 80 टक्के पेक्षा जास्त गुण समाजातील ज्या विद्यार्थ्यांना मळालेले असतील. त्याचप्रमाणे शासनाच्या विविध परीक्षेमध्ये यशस्वी मान्यवरांचा या आमसभेतील कार्यक्रमात संचालक मंडळामार्फत सत्कार आयोजित केलेला आहे. गुणवंतांनी कागदपत्रांसह डॉ. कर्तारसिंग सरदारसिंग परदेशी, परदेशी अ‍ॅक्सीडेंड हॉस्पीटल, लक्ष्मीनगर चाळीसगाव या पत्त्यावर पाठवावेत. समाजबांधवांसह सभासद बांधवांनी या सभा व सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन चाळीसगाव येथील परदेशी,राजपुत उन्नती मंडळाचे अध्यक्ष भरतसिंग देवचंद छानवाळ, कार्याध्यक्ष डॉ. कर्तारसिंग सरदारसिंग परदेशी, उपाध्यक्ष मथुराबाई भगवानसिंग लोदवाळ, खजिनदार डॉ. जयसिंग शामसिंग परदेशी, संचालक सुभाष मन्नुसिंग महाजन, अँड. हिरालाल पुनमचंद परदेशी, भगवान रघुवीरसिंग परदेशी, अशोक महादु परदेशी, संचालीका डॉ. सुशिला कर्तारसिंग परदेशी, सचीव निलेश जयसिंग राजपुत आदि संचालक मंडळामार्फत करण्यात आले आहे.


कॉपी करू नका.