अज्ञात वाहनाच्या धडकेत अमळनेरचा दुचाकीस्वार ठार


धरणगाव : दुचाकीला भरधाव वेगाने जाणार्‍या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अमळनेरातील दुचाकीस्वार तरुण ठार झाला. हा अपघात 24 जून रोजी घडला होता. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. बापू जंगलू कुंभार (ममुराबाद, ता.जळगाव, ह.मु. जळोद रोड, अमळनेर) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

अपघातात तरुण जागीच ठार
बापू कुंभार हे आपल्या पत्नीसह अमळनेर तालुक्यातील जळोद रोडवरील वीटभट्टीवर वास्तव्याला होते. मजुरी काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. 24 जून रोजी रात्री 11.30 वाजता बापू कुंभार हे त्यांची दुचाकी (एमएच 19 बीझेड 9162) ने अमळनेर तालुक्यातील सुनसगाव कडून अमळनेर शहराकडे जात होते. त्यावेळी धरणगाव तालुक्यातील वराड फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणार्‍या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत बापू कुंभार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी त्यांची पत्नी प्रीती कुंभार यांनी गुरुवार, 25 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता धरणगाव पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन कुवारे करीत आहे.


कॉपी करू नका.