श्रीराम कथा श्रवणातून आनंद प्राप्तीसोबतच मोक्षप्राप्तीचा मार्गही सुकर

राघवजी महाराज : बाल कलाकार आराध्या राजपूतच्या गुरु वंदना नृत्याविष्काराला दाद


फैजपूर : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम अवघ्या मानव जातीसाठी आदर्शवत जीवन संहिताच आहे. मानवाने आनंदी, समृद्ध व ईप्सित ध्येय साध्य करण्याकामी प्रभू श्रीराम कथेचे श्रवण केल्यास आनंद प्राप्तीसोबतच मोक्षप्राप्तीचा मार्गही सुकर होईल, असे विचार वक्ताश्री राघवजी महाराज यांनी व्यक्त केले. ते गुरुपौर्णिमा व ब्रह्मचारी महंत घनश्यामदासजी महाराज यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित संगीतमय राम कथेत चतुर्थ दिवसाच्या कथेत भक्तगणांना उपदेश करताना बोलत होते. या कथेचे मुख्य यजमान दोधू अमृत बोरोले व शशिकला दोधु बोरोले (चिनावल) हे आहे. चतुर्थ दिवसाच्या सेवेचे यजमान कॅप्टन डॉ.राजेंद्र रघुनाथ राजपूत व सोनाली राजेंद्र राजपूत होते.

कथा मंचावर यांची उपस्थिती
यावेळी कथा मंचावर मनीराम छावणी अयोध्या उत्तराधिकारी महंत कमल नयनदासजी महाराज, अयोध्या, खंडोबावाडी, गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, उत्तराधिकारी पवनकुमारदासजी पुजारी राममनोहरदासजी, कन्हैयादासप्रभूजी व विविध तीर्थक्षेत्राहून आलेले साधू, संत, महंत, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टी, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, अश्विनी जयस्वाल, जळगाव, कृउबाचे उपसभापती उमेश पाटील तसेच अमोदा हायस्कूलचे संचालक राजेश पाटील, गिरीश पाटील, शेखर वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आराध्या राजपूतचा नृत्याविष्कार
चतुर्थ दिवसाच्या कथेत प्रभू श्रीराम व भ्राता लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न यांच्या जन्मोत्सवाची रंजक कथा सादर करण्यात आली. यावेळी कथा मंचावरील महात्म्यांसाठी गुरुवंदना बालनृत्य कलाकार आराध्या राजेंद्र राजपूतने उत्कृष्टपणे नृत्याविष्कार सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. या संगीतमय श्रीराम कथेसाठी दररोज भंडारा व संत भोजन सुरू आहे. दर दिवशी कथेच्या समारोपप्रसंगी प्रसादाचे आयोजन करण्यात येते. जीवनाला पुनीत, पावन व आनंदित करणार्‍या कथेचे पंचक्रोशीतील भक्तगणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडलेश्वर महंत पुरुषोत्तम दासजी महाराज व पवनकुमारदासजी यांनी केले आहे. यशस्वीतेसाठी खंडोबावाडी देवस्थान, अमोल चौधरी, केयूर टेन्ट हाऊस फैजपूर, सीताराम बाबा आश्रम मित्र मंडळ, भुसावळ, विक्की जैस्वाल, फैजपूर, जय मल्हार गणेश मंडळ व समस्त गणेश मंडळे फैजपूर व पंचक्रोशीतील भक्तगण मोलाचे सहकार्य करीत आहेत.


कॉपी करू नका.