भुसावळात तंबाखूच्या दुष्पपरिणामांबाबत ताप्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची जनजागृती


भुसावळ : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता दहावीच्या 300 विद्यार्थ्यांनी ‘तंबाखूपासून होणार्‍या दुष्पपरिणाम’ या विषयावर गुरुवारी पथनाट्य सादर करीत त्यातून जनजागृती केली. नाहाटा कॉलेजच्या उड्डान पुलापर्यंत रॅली काढल्यानंतर विद्यार्थ्यांनी तंबाखू, सिगारेट, बीडी, गुटखा यावर नाटीका सादर करून व्यसनांचे दुष्पपरिणाम सांगत त्याबाबत जनजागृती केली.

शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर, व्हॉइस प्रिन्सिपल श्रद्धाली घुले, मनप्रीत कौर, चीफ ओएस सविता सहजे, गौरी प्रभुदेसाई, प्रतिभा काकडे, वर्षा काळे, मो.कय्युम शेख, पल्लवी बत्रा, अकबर खान, डॅनियल पवार, विजय संकट, मुकेश कोळी यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्रसंगी विद्यार्थ्यांनी हम सब ने एक ही ठाणा, तंबाखू को जडसे मिटाणा, एक दो एक दो, नशे की लट को छोड दो, नशे को दुर भगाना है यही संदेश बताना है अशा घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांच्या हातात धूम्रपान व तंबाखू यांच्यामुळे होणारा दुष्परिणामांचे पोस्टर होते.


कॉपी करू नका.