यावल बसस्थानकातून महिलेची पर्स लांबवली


यावल : यावल बसस्थानकावर शुक्रवारी कोळवद येथील 40 वर्षीय महिला जळगाव बसमध्ये बसत असताना गर्दीचा फायदा घेत महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने चोरी केली. पर्समध्ये पाच हजार 700 रुपये होते.

याबाबत महिलेने यावल पोलिसात तक्रार नोंदवली. कोळवद, ता.यावल येथील मंगला सरजु मोरे (40) ही महिला शुक्रवारी दुपारी यावल बसस्थानकावरून बसव्दारे जळगाव जात होती व बस आल्यानंतर गर्दी झाली मात्र त्याचा फायदा अज्ञात चोरट्याने घेत पर्स चोरी केली. हा प्रकार लक्षात आल्याने महिलेने चालक व वाहकास माहिती दिली व बसमध्ये पाहणी केली मात्र बसमध्ये बसण्यापूर्वीच पर्स चोरी झाल्याने बसमध्ये काहीचं मिळून आले. महिलेने याबाबत यावल पोलिसात तक्रार नोंदवली.


कॉपी करू नका.