सातपुड्यातील वंचित विद्यार्थी ‘देवा भाऊ की पाठशाळेत’ होणार साक्षर !

यावलच्या आश्रय फाउंडेशनचा उपक्रम : विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप


यावल : सातपुडा पर्यताच्या रांगेत असलेल्पा विश्रामजीन्सी, ता.रावेर या आदिवासी गावात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रय फाउंडेशन यावलच्या माध्यमातून शालेय साहित्य वितरण करण्यात आले. आश्रय फाऊंडेशन या समाजसेवी संघटनेच्या वतीने अध्यक्ष डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांच्यातर्फे ‘देवाभाऊ सेवा पर्व’ सुरू करण्यात आले. ‘देवा भाऊ की पाठशाळा’ या उपक्रमाच्या माध्यमातून जनजातीय क्षेत्रात लहान मुलांना अभ्यासाची, वाचनाची व शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून पाड्यावर वर्ग भरविले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
250 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच वृक्षारोपणही करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांच्या माध्यमातून हे उपक्रम राबवण्यात आले. जिल्हा परिषद शाळेच्या सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना स्कूल बॅगसह शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी ऑल विज वेल रुग्णालयाचे डॉ.सचिन महाजन यांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजित करण्यात आले. कार्यक्रमास विश्राम जिन्सी ग्रामपंचायतचे सरपंच चरणसिंग पवार, उपसरपंच रेवाबाई पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोकुळ पवार, धनलाला पवार, कांतीलाल पवार, राजु पवार, शिवाजी पवार, अमरसिंग पवार यांची उपस्थिती होती. आभार उदय पाटील यांनी मानले.


आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणणार
सातपुड्यात आजही अनेक आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असून त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी ‘देवाभाऊ सेवा पर्व’ सुरू करण्यात आले आहे. आदिवासी विद्यार्थी साक्षर होवून तो स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे, त्यांना नोकरी मिळाली पाहिजे या भावनेतून सेवेचा वसा कायम सुरू राहिल, असे आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन सुधाकर फेगडे म्हणाले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !