राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा गौप्यस्फोट : धनंजय मुंडे यांना पक्षात घेणे हा तर आत्मघातकी प्लॅन
बीड : पंधरा वर्षांपूर्वी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेणे हा आमचा आत्मघातकी प्लॅन होता, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले.
बीड जिल्ह्याच्या दौर्यावर असताना जयंत पाटील यांनी शनिवार, 27 रोजी हे विधान केले. या दौर्यात जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असणार्या सदस्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

यावेळी धनंजय मुंडे यांना पाठवून अजित पवारांना भाजपमध्ये आणण्याचा प्लॅन भाजप आणि आरएसएसचा होता का? असे विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, गोपीनाथ मुंडे साहेबांनी भाजप सध्या जे राजकारण करत आहे, असे राजकारण कधीच केले नाही. तो आमचाच आत्मघातकी आमचा प्लॅन होता, असे जयंत पाटील यांनी म्हटले. त्यामुळं धनंजय मुंडेंच्या तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.




