मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी आता भुसावळ मतदारसंघ समिती अध्यक्षपदी राजेंद्र आवटे

सदस्यपदी भालचंद्र पाटील, वैशाली सपकाळे यांची निवड


भुसावळ : शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना’ जाहीर केली आहे. शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुधारीत शासन निर्णयानुसार आमदार संजय सावकारे यांनी सुचविल्यानुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शिफारसीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भुसावळ विधानसभा क्षेत्राची समिती जाहीर केली आहे. यात अध्यक्षपदी माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांची तर सदस्यपदी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुनसगावचे भालचंद्र पाटील यांची आणि कुर्‍हेपानाचे येथील वैशाली शरद सपकाळे (कोळी) यांची नियुक्ती करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून लाडकी बहिण योजनेची जलद गतीने अंमलबजावणीसाठी मदत होणार आहे.


सात शासकिय सदस्यांना जबाबदारी
भुसावळ विधानसभा क्षेत्र स्तरावर असलेल्या या समितीत अध्यक्ष म्हणून राजेंद्र आवटे हे तर सचिव म्हणून तहसीलदार हे काम पाहतील. या समितीत सात शासकीय सदस्यांमध्ये गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, समाज कल्याणचे सहायक आयुक्त, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, संरक्षण अधिकारी हे असतील.

समितीची दरमहा बैठक
समितीची बैठक दरमहा तसेच आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येणार असून समिती सदर योजनेची देखरेख व सनियंत्रण करणे, सदर योजनेच्या अंमलबजावणी बाबत नियमित आढावा घेणे, या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घेणे, ग्रामीण व नागरी स्तरावर प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी तसेच तपासणी करणे, सदर अर्जासोबत जोडलेल्या कागद पात्रांची पडताळणी करणे असे या समितीचे कार्य व जवाबदारी असणार आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !