रावेर विधानसभेसाठी माजी नगराध्यक्ष दारा मोहंमद इच्छूक

काँग्रेसकडे मागितली उमेदवारी : पत्रकार परिषदेत दिली माहिती


रावेर : रावेर विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे उमेदवारी मागितल्याची माहिती माजी नगराध्यक्ष दारा मोहंमद यांनी पत्रकार परिषदेत दिली. दारा मोहंमद जफर मोहंमद, इंटकचे भगतसिंग पाटील व माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन या तिघांनी मुंबई येथे प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे रावेर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचा अर्ज सादर केला. याबाबत बुधवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

मतदारसंघाचा विकास झालाच नाही
दारा मोहंमद म्हणाले की, रावेर शहरासह मतदारसंघाचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. बीड जिल्ह्यात जाऊन एका नगरपालिकेला भेट देऊन जास्तीत-जास्त निधी कसा आणता येतो याचा आपण अभ्यास केला आहे. आपणास काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यास आपण हमखास निवडून येऊन मतदारसंघाच्या विकासासाठी निधी आणून विकास करून दाखवू. यासाठी पक्षाने उमेदवारी द्यावी .


यांची होती उपस्थिती
यावेळी भगतसिंग पाटील, ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी या पत्रकार परिषदेत आर.के.चौधरी, माजी नगरसेवक आसीफ मोहम्मद, एस.आर.चौधरी, माजी नगरसेवक जगदीश घेटे, बिसन सपकाळ, धुमा तायडे, सावन मेढे, सरपंच समाधान पाटील, कलिंदर तडवी, निलेश महाजन, आणि कैलास वाणी उपस्थित होते. तिघांपैकी एकाला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !