भुसावळ रेल्वे विभागात सद्भावना दिनानिमित्त कार्यक्रम


भुसावळ : सर्व धर्म समभाव, भाषा व क्षेत्रातील लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व सौहार्द वाढावे यासाठी रेल्वेच्या भुसावळ विभागातील मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात मंगळवारी सकाळी 11 वाजता सद्भावना दिवस साजरा करण्यात आला. रेल्वे मंडळ व मध्य रेल्वेच्या मुंबईस्थित मुख्यालयाच्या आदेशानुसार मंडळ रेल्वे प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांनी उपस्थितांना एकत्रीत शपथ दिली. प्रसंगी अपर मंडळ रेल्वे प्रबंधक मनोज सिन्हा, वरीष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे, वरीष्ठ मंडळ संरक्षा अधिकारी एन.के..अग्रवाल, वरीष्ठ मंडळ विद्युत अभियंता (टीआरडी) प्रदीप ओक, वरीष्ठ मंडळ यांत्रिक अभियंता लक्ष्मीनारायण, मंडळ कार्मिक अधिकारी एम.के.गायकवाड, सहा.कार्मिक अधिकारी विरेंद्र वडनेरे, सहा.कार्मिक अधिकारी राजेंद्र परदेशी व सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


कॉपी करू नका.