दोन हजारांची लाच भोवली : धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात


Bribe of 2000 : Clerk of Dhule Superintendent of Police in ACB’s net धुळे : सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची बिले काढून देण्याच्या मोबदल्यात व उर्वरीत बिले काढून देण्यासाठी दोन हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला धुळे एसीबीने अटक केल्याने जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. सुनील वसंत गावीत (48, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

सेवानिवृत्त पोलीस अधिकार्‍याकडेच मागितली लाच
62 वर्षीय तक्रारदार हे धुळे पोलीस दलातून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून सन 2019 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर त्यांची राहिलेली बिले मंजूर होण्यासाठी 10 जुलै 2024 पोलीस अधीक्षक, धुळे कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी त्यांना एक लाख 29 हजार 888 रुपयांचे बिल बँक खात्यातून प्राप्त झाले. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांच्या उर्वरित बिलाबाबत गावीत यांची कार्यालयात 2 रोजी भेट घेऊन चौकशी केली असता, आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे अदा केलेल्या बिलाच्या मोबदल्यात व बाकी राहिलेली बिले वाढवून देण्याचे काम करून देण्याकरीता कोषागार कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या नावाने दोन हजार रुपये लाच मागितली व तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर पडताळणी करून सापळा रचण्यात आला. मंगळवारी दुपारी लाच स्वीकारताच गावीत यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.






यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, नाईक संतोष पावरा आदींच्या पथकाने यशस्वी केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !