भुसावळातील आतीश खरात ठाणे कारागृहात स्थानबद्ध


Atish Kharat in Bhusawla lodged in Thane Jail भुसावळ : भुसावळ शहरातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आतीश रवींद्र खरात यास स्थानबद्ध करण्याबाबत जळगाव जिल्हाधिकार्‍यांनी आदेश पारीत करताच शहर पोलिसांनी आदेशाची अंमलबाजावणी केली. संशयीताला ठाणे कारागृहात हलवण्यात आले.

आतीश खरातविरोधात गंभीर गुन्हे
समता नगरातील आतीश खरातविरोधात विविध गंभीर गुन्हे दाखल असून त्याची मोठी दहशत असल्याने शहर पोलिसांनी त्यास स्थानबद्ध करण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांना पाठवला होता. चौकशीअंती संशयीताला स्थानबद्ध करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, शहर पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.


कॉपी करू नका.