न्हाई प्रकल्प संचालकांच्या बदलीची शिफारस करणार : मंत्री रक्षा खडसे

‘दिशा’च्या बैठकीत मंत्री रक्षा खडसे भडकल्या : सर्वच लोकप्रतिनिधींची तक्रार


जळगाव : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (न्हाइ) प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांच्यावर कारवाईची मागणी करणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी शनिवारी जळगावात दिली. जळगावसाठी चांगल्या अधिकार्‍याच्या नियुक्तीची मागणीही करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

‘दिशा’बैठकीत खड्डे गाजले
‘दिशा’ समितीच्या बैठकीत महामार्गावरील खड्यांचा विषय चांगलाच गाजला, याबाबत सर्वच लोकप्रतिनीधींनी नाराजी व्यक्त केल्यावर मंत्री रक्षा खडसे चांगल्याच भडकल्या. त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना विचारणा केली परंतु, अधिकारी ठेकेदाराकडे बोट दाखवत गेल्यानंतर खडसे यांनी संताप व्यक्त केला. डागडुजी करूनही रस्त्यांची


नितीन गडकरींची भेट घेणार
प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची आपण भेट घेणार आहोत. कारवाईपेक्षा या अधिकार्‍याच्या बदलीसाठी खासदार स्मिता वाघ आणि मी पाठपुरावा करणार आहे. कुशल व चांगला अधिकारी आणण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे रक्षा खडसे यांनी स्पष्ट केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !