फैजपूर विभागाच्या प्रांताधिकारीपदी बबनराव काकडे


फैजपूर : ऐतीहासिक फैजपूर शहराच्या प्रांताधिकारीपदी बबनराव काकडे यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले.

फैजपूर उपविभागीय अधिकारी तथा प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी देवयानी यादव या त्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यकाळ पूर्ण करून उत्तर प्रदेशातील कॅडरमध्ये गेल्याने हे पद रिक्त होते. या ठिकाणी नेमकी कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता होती. अखेर या पदावर बबनराव काकडे यांची नियुक्ती करण्यात आली. महसूल व वन खात्याचे उपसचिव महेश वरूडकर यांनी याबाबतचे आदेश निर्गमीत केले आहेत. बबनराव काकडे उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी असून त्यांनी याआधी रावेरचे तहसीलदार म्हणून तीन वर्षे यशस्वीपणे कारभार पाहिला आहे. कर्तव्यदक्ष व संवेदनशील अधिकारी म्हणून त्यांची ख्याती जनामानसात आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !