अजितदादांनी विरोधकांना ठणकावले : म्हणाले, तर राजकारण सोडेन…!


Ajitdad slammed the opponents: said, then I will leave politics…! नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना फैलावर घेत वेषांतराबाबत पुरावा दिल्यास आपण राजकारणातून निवृत्ती घेवू, असे स्पष्टपणे नाशिक दौर्‍याप्रसंगी सांगितले. वेषांतर प्रकरणावरून राज्यात सुरू असलेल्या आरोपांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खंडन यावेळी केले.

मला कळते माझी जवाबदारी
नाशिक जिल्हा दौर्‍यावर आलेल्या अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार यांनी वेशांतर प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोपांचा समाचार घेतला. आपण नाव आणि वेष बदलून प्रवास केल्याच्या बातम्या धादांत खोट्या आहेत. मी कधीही वेश बदलून प्रवास केला नाही. विरोधकांनी आरोप करण्यापूर्वी त्याची माहिती घ्यावी. गेल्या 35 वर्षांत मी राज्याचा आमदार राहिलो, खासदार होतो, अनेकदा उपमुख्यमंत्री राहिलो आहे. मला माझी जबाबदारी कळते.


सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. माझ्यासंदर्भात गैरसमज निर्माण करण्याचे काम केले जात आहे. कोण बहुरूपी म्हणतेय, कोण अजून काही म्हणतोय. म्हणणार्‍यांना लाज-लज्जा वाटली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !