‘देवाभाऊ सेवा पर्व’ अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप


यावल (6 ऑगस्ट 2024) : शिक्षणाचे पर्व, देवाभाऊ सेवा पर्व अंतर्गत ‘देवाभाऊ की पाठशाला’ हा उपक्रम रावेरसह यावल तालुक्यात आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या माध्यमातून राबवला जात आहे. परिसरातील स्थलांतरित शेतमजूर, वीटभट्टी कामगार, विविध प्रवर्गातील लहान मुले शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून प्रवासी शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न ‘देवाभाऊ सेवा पर्व’

या माध्यमातून राबवला जात आहे.


शैक्षणिक साहित्याचे वाटप
प्रकल्पाची पाहणी डॉ.कुंदन फेगडे यांनी केली. यावेळी आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतांना डॉ.फेगडे म्हणाले की, भारताचे भविष्य उज्वल होत असल्याची जाणीव हा प्रकल्प पाहिल्यावर होते. मायबाप जनतेच्या हितासाठी झटण्याची उर्मी अश्या ठिकाणाहूनच मिळत. अशयाच पद्धतीने मतदारसंघातील अधिकाधिक विद्यार्थ्यांवर संस्कार होण्यासाठी आपल्या सगळ्यांना पुढच्या काळात प्रचंड काम करावे लागणार असल्याचे डॉ.फेगडे म्हणाले. यावेळी पंकज महाजन, महेश गडे, राम शिंदे आदी उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !