यावल-किनगाव बस प्रवासात वयोवृद्धेची एक लाखांची पोत लांबवली


An elderly woman was extended a donation of one lakh in the Yaval-Kingao bus journey यावल (7 ऑगस्ट 2024) : यावल तालुक्यातील किनगाव येथून यावलकडे एस.टी.बसमध्ये प्रवास करताना 60 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची सुमारे एक लाखांची पोत लांबवण्यात आली. हा प्रकार यावल बस स्थानकावर निदर्शनास आला. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना सोमवारी दुपारी घडली.

गर्दीचा फायदा घेत लांबवली पोत
चोपड्याकडून बर्‍हाणपूर जाणार्‍या एस.टी.बसमध्ये किनगाव ते यावल दरम्यान मंगला वसंत पवार (60, श्री गणेश नगर, देवपूर) ही महिला प्रवास करीत असताना तिच्या गळ्यातील 95 हजार रुपये किंमतीची सोन्याची मनी असलेली पोत चोरट्याने चोरी केली. हा प्रकार यावल बस स्थानकाजवळ महिलेच्या निदर्शनास आला. मंगला पवार यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !