भुसावळात सर्वत्र खड्डे : पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी उद्या लांब उडी स्पर्धा


भुसावळ (7 ऑगस्ट 2024) : शहरात पावसामुळे वर्दळीच्या सर्वच रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडले आहेत तर यावल रस्त्याची व राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोर सर्वाधिक मनस्ताप वाहनधारकांना होत आहे. एक महिना उलटूनही पालिकेचे अधिकारी व लोकप्रतिनिधी बेदखल असल्याने याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे गुरुवार, 8 रोजी सकाळी 10 वाजता लांब उडी मारा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना आकर्षक बक्षीसही दिले जाणार आहे.

वाहनधारकांना जडले आजार
भुसावळ शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठ-मोठ्ठे खड्डे पडून महिना उलटला मात्र तरीही दखल घेतली जात नसल्याने शहरातील नागरिक व विद्यार्थी, वाहन चालक अत्यंत त्रस्त झाले आहेत. अपघातांची मालिका रोज कायम आहे. शहरातील खड्ड्यांचा प्रश्न सुटण्यासाठी व नगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी जुना सातारा भागातील सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्यासमोरील खड्ड्याजवळ भुसावळ शहर शिवसेनेच्या वतीने गुरुवारी सकाळी 10 वाजता लांब उडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जीवघेण्या खड्ड्यातून जो सर्वाधिक लांब उडी मारेल त्यास बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेत भुसावळ शहरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख दीपक धांडे यांनी केले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !