राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार पहिला जप्ता


The first seizure will be deposited in the accounts of beloved sisters across the state on this day मुंबई (7 ऑगस्ट 2024) : राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्षाबंधनापूर्वीच बहुचर्चित योजनेतील पहिल्या हप्त्याची रक्कम शनिवार, 17 ऑगस्टला मिळणार आहे. ं रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळणार असल्याने त्यांच्यात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. राज्यात आजअखेर एक कोटी 40 लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी एक कोटी अर्जांची छानणी सुद्धा पूर्ण झाली तर 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुभा आहे.

मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट रोजी मिळणार आहे. याबाबत शासन दरबारी निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे 17 ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात वितरीत केले जातील. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आल्याचे समजते.


तीन हजार खात्यात येण्याची शक्यता
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील. 17 जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा एकत्रीत हप्ता म्हणजेच तीन हजार रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट जमा होणार असल्याचीही माहिती आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !