भुसावळसह वरणगावातील अमृत पाणी योजनेसाठी आज मुंबईत बैठक

दीपनगर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवरही होणार चर्चा


Meeting in Mumbai today for Amrit Pani Yojana in Varangaon with Bhusawal भुसावळ (7 ऑगस्ट 2024) : अटल मिशन फार रेजुवेनशन एंड अर्बन ट्रांसफार्मेशन अर्थात अमृत योजना टप्प्या दोनच्या 136 कोटी 77 लाख रुपयांच्या प्रस्तावाला राज्य शासनाने तांत्रिक समितीने मंजूरी दिली. यानंतरही पहिला टप्प्यातील कामे पूर्ण झाली नसल्याने आमदार संजय सावकारे यांनी भुसावळ व वरणगाव येथील योजनेना तसेच दीपनगरातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांच्या संदर्भात बैठक लावण्याची मागणी केली होती. यानुसार आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात दालनात गुरुवार, 8 ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा वाजता तातडीची बैठक होणार आहे.

विविध विषयांवर होणार चर्चा
या बैठकीत भुसावळातील रखडलेली अमृत योजना सोबतच वरणगाव येथील अमृत अभियानाचा आढावा व दीपनगर औष्णिक केंद्रातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांच्या संदर्भात बैठकीत चर्चा होईल. भुसावळ अमृत योजनेसाठी ठेकेदार अर्थात एजन्सी तत्पर असतानाही पालिका व एमजीपी कडून तांत्रिक सहाय्य मिळत नाही. यामुळे कामे करण्यास ठेकेदारालाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. आदींसह विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होईल. या बैठकीला आमदार संजय सावकारे यांच्यासह उर्जा विभागाचे अपर मुख्य सचिव, नगरविकासचे प्रधान सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित राहतील. तसेच जिल्हाधिकारी, महापालिकेचे आयुक्त, प्रांताधिकारी भुसावळ, मुख्याधिकारी भुसावळ हे व्हिसीव्दारे बैठकीला उपस्थित असतील. या बैठकीत काही ठोस निर्णय होऊ शकतील काय? याकडेही भुसावळ, वरणगावातील रहिवासी तसेच दीपनगर औष्णिक केंद्रातील प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागून आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !