भुसावळ शहरातील अमृत योजनेची टप्प्पा दोनची तत्काळ निविदा काढा

मुंबईच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना


Call for immediate tender for phase two of Amrit Yojana in Bhusawal city भुसावळ (9 ऑगस्ट 2024) : भुसावळ शहरातील अमृत योजना टप्पा – 2 आणि वरणगाव येथील पाणीपुरवठा योजनेच्या पार्श्वभुमीवर गुरूवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात दुपारी 2.30 वाजता तातडीची बैठक घेण्यात आली. यात भुसावळच्या अमृत योजना टप्पा दोनची निविदा काढून ही योजता तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकारी, सचिवांना दिले. या बैठकीला आमदार संजय सावकारे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

अमृत योजनेबाबत आढावा
मुंबईत झालेल्या या बैठकीत भुसावळातील रखडलेली अमृत योजना सोबतच वरणगाव येथील अमृत अभियानाचा आढावा घेण्यात आला. दीपनगर औष्णिक केंद्रातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा झाली. भुसावळ अमृत योजनेसाठी एजन्सी (कंत्राटदार) कामे करण्यास तयार असूनही पालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून अपेक्षित तांत्रिक सहाय्य मिळत नसल्याने कामे करताना अडचणी येतात. यासह विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शहरातील पाणी पुरवठ्याचा आढावा घेत, अमृत योजनेची काय स्थिती आहे, दुसर्‍या टप्याचे काम सुरू का झाले नाही, याची माहिती घेत सचिव यांना पाणीपुरवठा योजनेत काहीही अडचण यायला नको, अश्या सूचना केल्यात.


यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीला आमदार संजय सावकारे, उर्जा विभागाचे अपर मुख्य सचिव, नगरविकासचे प्रधान सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी, भुसावळ प्रांताधिकारी, मुख्याधिकारी हे व्हीसीद्वारे सहभागी झाले होते.

लवकरच सुरू होणार काम
शहरातील पाणी पुरवठ्यासाठी असलेली अमृत योजना टप्पा – 2 हीचे सुध्दा काम आता लवकरच सुरू होणार आहे. पहिल्या टप्यातील कामे तात्काळ पूर्ण करावी, वरणगाव येथील योजनेसाठी सुध्दा जिल्हाधिकारी यांना सूचना करून एनजीपी व पालिकेच्या मुख्याधिकारी यांची बैठक घेऊन काय समस्या आहे, त्या सोडवाव्यात, काही अडचण असल्यास त्याची माहिती सचीवांना देऊन भुसावळ व वरणगावचा पाणी प्रश्न तात्काळ सोडवा, अश्या सक्त सूचना केल्यात.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !