अजितदादांनी स्पष्टच सांगितले : मराठा आरक्षण प्रश्नावर लवकरच सर्वपक्षीय बैठक !


Ajitdad said clearly: All-party meeting soon on the Maratha reservation issue! दिंडोरी (10 ऑगस्ट 2024) : आरक्षण प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीसोबत बोलताना दिली आहे. जरांगे पाटील यांनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली आहे, तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला आहे.

विधानसभा एकत्रीतपणे लढणार !
अजित पवार यांना जरांगे पाटील यांनी मंत्री भुजबळ यांना दिलेल्या इशारार्‍यावर बोलताना पवार यांनी नो कमेंट्स अशी प्रतिक्रिया दिली. महायुती एकत्र बसून विधानसभेसाठी तयारी करणार आहे. आम्ही येणारी विधानसभा एकत्रित सामोपचाराने लढणार आहोत, असेही अजित पवार म्हणाले.


वक्फ बोर्डाच्या जमिनीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, वक्फ बोर्डाच्या महाराष्ट्रातील जमिनीला कशाही प्रकारचा धक्का लागून त्या जमिनी कोणाच्यातरी घशात जातील हा प्रयत्न होता कामा नये म्हणून आम्ही काळजी घेतली आहे. त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर पुढच्या गोष्टी राज्य सरकारकडून केल्या जाणार आहेत, असंही अजित पवार म्हणाले.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !