अवैध गॅस रिफिलिंग : धुळ्यासह नाशिक ग्रामीण व अहमदनगरात छापेमारी ; 26 आरेापींसह 27 लाखांचा मुद्देमाल जप्त


भुसावळ (11 ऑगस्ट 2024) : विशेष महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या आदेशानंतर धुळे, नाशिक ग्रामीण व अहमदनगरात विशेष पथकाने अवैधरीत्या गॅस रिफिलिंग करणार्‍यांवर एकाचवेळी छापेमारी केली. तीन्ही शहरांमध्ये 18 कारवायांच्या माध्यमातून 26 आरोपींवर कारवाई करण्यात आली व 26 लाख 53 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आपापल्या हद्दीत कुठल्याही प्रकारे अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा व्यवसाय चालणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना विशेष महानिरीक्षकांनी दिल्या आहेत.

नाशिक ग्रामीणमध्ये चार केसेस
नाशिक ग्रामीणमध्ये पथकाने चार कारवायांच्या माध्यमातून पाच आरोपींवर कारवाई केली. 15 गॅस सिलिंडर, चार गॅस भरण्याचा पंप, दोन इको वाहने मिळून चार लाख 95 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.






अहमदनगरमध्ये सात केसेस
अहमदनगर येथे सात केसेसच्या माध्यमातून 13 आरोंपीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. 192 गॅस सिलिंडर, सात गॅस भरण्याचे पंप व पाच वाहने जप्त करण्यात आली. 18 लाख 36 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

धुळ्यात सात ठिकाणी छापेमारी : आठ जणांविरोधात गुन्हे
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या आदेशानुसार एलसीबी व विशेष महानिरीक्षकांच्या पथकाने एकाच वेळी मालेगाव रोड, चाळीसगाव रोड, शंभर फुटी रोड, वडजाई रोड, मच्छी बाजार, सद्धेश्वर गणपती मंदिर, साक्री रोड विथे छापा टाकला. या प्रकरणी शहाबुद्दीन करिमुल्ला शहा, अकबर शेख नसीर शेख, मसेब एजाज शेख, मुजाहिद अब्दुल रशीद, मोहंमद अर्षद जलील अहमद, सखाराम विठ्ठल गवळी, स्पेश भटू गवळी या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीतांकडील 34 भरलेले तसेच 28 रीकामे व नळीसह नोझल, 8 गॅस भरण्याचे पंप, पाच वजन काटे मिळून तीन लाख 21 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !