केळीसाठी क्लस्टरला वर्षभरात मंजुरी मिळणार : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे
Banana cluster to be approved within a year : Union Minister of State Raksha Khadse रावेर (11 ऑगस्ट 2024) : केळीसाठी क्लस्टरला वर्षभरात मंजुरी मिळणार असून बर्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाचे लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी येथे दिली. शहरातील अग्रसेन भवनात भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मेळावा झाला. याप्रसंगी मंत्री झाल्यानंतर रक्षा खडसे यांचा भाजपच्या विविध संघटना अंतर्गत सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे होते.
कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला यश
मंत्री खडसे म्हणाल्या की, रावेर मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे मला हे यश मिळालं व आपल्यामुळेच मी मंत्री झाले. ज्याप्रमाणे लोकसभा निवडणूक कार्यकर्ते विविध संघटना व बूथप्रमुखांच्या मेहनतीमुळे सर्व कार्यकर्ते भाजपने जिंकली त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या कामालाही लागून विधानसभा भाजपकडे राहील यासाठी प्रयत्न सर्वांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. यासाठी सर्वांनी केंद्र शासन व राज्य सरकार यांच्या योजनांची माहिती गावा-गावात द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. लोकसभा निवडणूक ही यावर्षी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीप्रमाणे लढली गेली. पुढील विधानसभा निवडणुकीत ही याच पद्धतीने काम करून यश संपादन केल्यास पुढील जिल्हा परीषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत पक्षाला यश हमखास मिळेल यासाठी कार्यकर्त्यांनी पराकाष्ठा करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, नंदकिशोर महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना पाटील, केतकी पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, भरत महाजन, पांडूरंग सराफ, श्रीकांत महाजन, सुनील पाटील, हरलाल कोळी, राजन लासूरकर, अलका चौधरी, जितु पाटील, संजय बुवा, नितीन पाटील, भाजप तालुकाध्यक्ष महेश चौधरी, दुर्गेश पाटील, रवींद्र महाजन, महेश पाटील, चंद्रकांत पाटील, शिवाजी पाटील, माधुरी नेमाडे, दिलीप पाटील, अहमद तडवी, गोमती बारेला यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या विविध संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी, बुथप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक महेश चौधरी तर सूत्रसंचालन वासुदेव नरवाडे यांनी केले.




