यावल तालुका भाजपा अल्पसंख्याक तालुकाध्यक्षपदी अल्ताफ शेख
यावल (11 ऑगस्ट 2024) : यावल शहरातील रहिवासी शेख अल्ताफ अब्दुल समद यांची भाजपा अल्पसंख्यांक यावल तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे ग्रामीण विकासमंत्री मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.
प्रसंगी झिकरा एजुकेशन सोसायटी अध्यक्ष रहिम शेख, वाकडी सरपंच शेखर वाणी उपस्थित होते. ही निवड भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या सूचनेवरून तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांनी केली. अल्ताफ शेख यांच्या तालुकाध्यक्षपदी झालेल्या या निवडीबद्दल त्यांचे डॉ.कुंदन फेगडे, शहराध्यक्ष राहुल बारी, डॉ.निलेश गडे, विलास चौधरी, हेमराज फेगडे, भूषण फेगडे, किशोर कुलकर्णी, गोपालसिंह पाटील आदींने अभिनंदन केले आहे.





