शेतकर्‍यांसाठी ई पीक विमा योजना ऑफलाईन राबवा

भुसावळचे शिशिर जावळे यांची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी


भुसावळ (12 ऑगस्ट 2024 ) : शेतकर्‍यांसाठी ई पीक विमा योजना ऑफलाईन राबवून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

शेतकर्‍यांना मिळावा दिलासा
निवेदनाचा आशय असा की, महायुती सरकारच्या कृषी विभागाने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात 2023 साली महाराष्ट्र राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना किमान एक हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये या प्रमाणे अर्थसहाय्य देण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी एकूण एक हजार 548 कोटी 34 लाख रुपये इतका तर सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांसाठी दोन हजार 646 कोटी 34 लाख रुपये असा एकूण चार हजार 192 कोटी 68 लाख रुपये इतक्या निधी खर्चास मान्यता मिळाली आहे. या योजनेचा लाभ अनुदान थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा होण्यासाठी शेतकर्‍यांनी कृषी विभागाच्या ई पीक पाहणी पोर्टलवर त्यांच्या शेताची माहिती बँकेचे पासबुक आधार कार्ड, पिकाचा फोटो वगैरे माहिती भरणे बंधनकारक आहे मात्र 2024 व 2025 या वर्षांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने मंजूर केलेल्या नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यासाठी या पोर्टलवर शेतकर्‍यांनी आवश्यक माहिती ई पीक पाहणी पोर्टलवर जमा करणे बंधनकारक केले आहे मात्र कृषी विभागाचे ई पीक पाहणी पोर्टलच सर्व्हरच बंद असल्यामुळे शेतकरी प्रचंड त्रासले आहेत.


शेतकर्‍यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून त्यांना मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास होत आहे . कृषी विभागाने तातडीने याला पर्यायी व्यवस्था म्हणून ऑफलाईन पद्धतीने सदर पीक विमा नुकसान भरपाई योजनेचा लाभ शेतकरी बांधवांना मिळण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे संबंधित तलाठी, अधिकार्‍यांकडेजमा करून तातडीने 2024-20े25 या वर्षांची भरपाई रक्कम शेतकर्‍यांच्याबँक खात्यावर त्वरित जमा करावी, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकांद्वारे केली आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !