विधानसभा निवडणुकीचा दिवाळीनंतर उडणार धुराळा !

आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये तर निकाल नोव्हेंबरमध्ये लागणार ; इच्छुकांकडून लॉबींग


After Diwali, assembly elections will be in full swing! मुंबई (13 ऑगस्ट 2024) : राज्यात नवीन विधानसभा 26 नोव्हेंबर 2024 रोजी अस्तित्वात येण्याची शक्यता असून विधानसभा निवडणुका दिवाळी आटोपताच नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने त्यात आचारसंहिता लागल्यास ही बाब गैरसोयीची ठरणार असल्याने दिवाळीनंतर निवडणुका होतील, अशी सूत्रांची माहिती आहे.

नोव्हेंबर महिन्यात लागणार निकाल
आचारसंहिता लागू झाल्यानंतर साधारणत: 45 दिवसांनी नवीन विधानसभा अस्तित्वात येणे अपेक्षित असते. येत्या 26 नोव्हेंबरपूर्वी 45 दिवस म्हणजे 12 ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाली तरी विहित कालमर्यादेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दिवाळी 3 नोव्हेंबर रोजी संपणार असून नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात मतदान होईल. 14 किंवा 15 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. नवीन आमदारांच्या शपथविधीसाठी विधानसभेचे पहिले अधिवेशन बोलावण्याकरिता त्यानंतर 12 दिवस हाती असतील.


कॉपी करू नका.