नगराध्यक्षांचा कालावधीत आता इतक्या वर्षांची वाढ : जाणून घ्या मंत्री मंडळाचे महत्वपूर्ण निर्णय


मुंबई (13 ऑगस्ट 2024) : शिंदे सरकारने मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 रोजी घेतलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण 8 महत्त्वाचे निर्णय घेतले. नगरविकास विभागाने नगराध्यक्षांच्या कालावधीत वाढ केल्याने आता अडीच वर्षांच्या ऐवजी पाच वर्ष नगराध्यक्षांचा कार्यकाळ असणार आहे.

कॅबिनेटमध्ये घेण्यात आलेले 8 मोठे निर्णय


विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार 149 कोटीस मान्यता (पशूसंवर्धन व दुग्धविकास)

मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय, लाखो नागरिकांना लाभ (महसूल विभाग)

डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च 2025 पर्यंत शिथील (सहकार विभाग)

शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना ठोक
मानधन (वैद्यकीय शिक्षण विभाग)

सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रिटीकरण. सुधारित 37 हजार कोटी खर्चास मान्यता (सार्वजनिक बांधकाम विभाग)

नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष (नगरविकास विभाग)

सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार (ऊर्जा विभाग)







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !