जरांगे पाटलांचा हल्लाबोल : शरद पवारांनी वाटोळे केल्यानेच तुमच्याकडे मागतोय आरक्षण


मुंंबई (13 ऑगस्ट 2024) :  सत्ताधारी महायुतीवर सातत्याने टीका करणार्‍या मनोज जरांगे यांनी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. जनतेला माहीत आहे त्यांनी वाटोळं केलं आहे, त्यामुळेच तर लोक आता तुमच्याकडे आरक्षण मागत आहेत, अशी भूमिका जरांगे यांनी मांडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

म्हणूनच तुमच्याकडे आरक्षण मागतोय
एका प्रश्नावर उत्तर देताना जरांगे म्हणाले की, तुम्ही म्हणाला होतात की सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करू. चार दिवसांत गुन्हे मागे घेऊ असं तुम्ही 1 वर्षांपूर्वी म्हणाला होता. जनतेला माहीत आहे त्यांनी वाटोळं केलं आहे. म्हणून तर लोक आता तुमच्याकडे आरक्षण मागत आहेत. पण तुम्ही तर त्यांच्यापेक्षाही खालच्या विचारांचे निघाला आहात. आमचं कोणी वाटोळं केलं, हे समाजाला माहित आहे, 16 टक्के आरक्षण कुठं गेलं, हेही समाजाला माहीत आहे. त्यांनी आरक्षण दिलं नाही म्हणून तुम्हालाही द्यायचं नाही का? असा सवाल मनोज जरांगेंनी पत्रकार परिषदेतून विचारला आहे.


दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप सत्ताधारी महायुतीकडून वारंवार केला जातो. मात्र याच जरांगे यांनी आता थेट शरद पवार यांच्यावर आक्रमक शब्दांत टीका केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !