इंदौरची तरुणी धुळ्यात जळीत अवस्थेत आढळली : उपचारादरम्यान मृत्यू


Indore girl found burnt in dust: died during treatment धुळे (14 ऑगस्ट 2024) : इंदौर शहरातील रक्षिता महेश पाटीदार (24) ही तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत शहरानजीकच्या नगांव शिवारातील एका शेतात मंगळवारी सकाळी आढळल्यानंतर खळबळ उडाली. अत्यवस्थ अवस्थेत तिला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलवले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घातपाताचा संशय असल्याने पश्चिम देवपूर पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे.

तरुणीजवळ आढळला ज्वलनशील पदार्थ
हॉटेल विश्रांतीच्या पाठीमागे ही तरुणी गंभीररीत्या जळालेल्या अवस्थेत आढळली. तरुणीनजीक मोबाईल असल्याने स्थानिकांनी तिच्या मोबाइलवरुनच कुटुंबीयांना तसेच नियंत्रण कक्षालाही माहिती दिली. तिच्यानजीक मोबाईल, बॅग आणि एका प्लास्टीकच्या बरणीत ज्वलनशील पदार्थ आढळल्याचे सांगण्यात आले. मयत तरुणीचे नातेवाईक सायंकाळी धुळ्यात दाखल झाले असून पोलिसांनी अधिक तपासाला वेग दिला आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !