काँग्रेसचे दोन आमदार मुख्यमंत्र्यांना भेटले ; लवकरच पक्ष प्रवेश ?


Two Congress MLAs met the Chief Minister ; Join the party soon? मुंबई (14 ऑगस्ट 2024) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी काँग्रेसच्या दोन आमदारांनी भेट घेतल्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप असणार्‍या काँग्रेस आमदारांवर पक्ष कारवाई करणार असल्याची शक्यता असतानाच काँग्रेसचे ईगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर आणि नांदेश जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर अशी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आगामी काळात ते शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे.

क्रॉस कोटींगचा आमदारांना बसणार फटका
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर, सुलभा खोडके, झिशान सिद्दिकी आणि मोहन हंबर्डे यांनी विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करत महायुतीच्या उमेदवारांना मदत केल्याची चर्चा आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या पाचही आमदारांना काँग्रेस पक्ष तिकीट देणार नसल्याचे समजते. याबाबतच्या सूचना काँग्रेस हायकमांडने काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या राज्य पातळीवरील नेत्यांना दिल्या. क्रॉस वोटिंगच्या आरोपामुळे ज्या आमदारांचं तिकीट कापलं जाणार आहे त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसकडून युवा चेहर्‍यांना संधी दिली जाणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे कारवाईची टांगती तलवार असलेल्या विद्यमान आमदारांनी नवे पर्याय शोधण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे.


आम्ही काँग्रेसमध्येच राहणार
दोन्ही आमदारांनी आपण काँग्रेस सोडणार नसल्याचं म्हटलं आहे. मी निधीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून मी काँग्रेससोबत होतो आणि आगामी काळातही काँग्रेससोबतच राहणार आहे. मला पक्षाकडून उमेदवारी मिळणार आहे, असा दावा हिरामण खोसकर यांनी केला आहे तर दुसरीकडे, जितेश अंतापूरकर यांनीही पक्षांतराच्या चर्चा फेटाळल्या आहेत. मी ई-पिक पाहणी अहवालाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे ते म्हणाले.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !