एक्स्प्रेस फिडरमधील दोष दुरुस्त न केल्यास आंदोलन : यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांचा इशारा
Agitation if defects in Express Feeder are not rectified : Warning of former mayor of Yaval, Atul Patil यावल (14 ऑगस्ट 2024) : यावल शहरवासीयांना नियमित पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने जलशुद्धीकरण केंद्र व साठवण तलावाच्या ठिकाणी कायम स्वरूपात वीज उपलब्ध होण्यासाठी यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या संकल्पनेतून एक्सप्रेस फिडर बसवण्यात आले होते. शहरवासीयांना वेळेवेर नियमित पाणी मिळावे हा त्यामागील उद्देश होता मात्र अलीकडे फिडरच्या इन्करमध्ये दोष निर्माण झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. विद्युत कंपनीने तातडीने दोष (बिघाड) दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिला आहे.
खंडित विजेमुळे पाणीपुरवठा विस्कळीत
यावल शहरवासीयांना नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी साठवण तलाव व जलशुद्धीकरण केंद्रावर एक्स्प्रेस फिडर मंजूर करून घेण्यात आले मात्र तांत्रिक दोषामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्याचा फटका शहराच्या पाणीपुरवठ्याला बसत आहे. विद्युत वितरण कंपनी यांनी इन्कमरमध्ये यावल नगरपालिकेसह अन्य तीन ठिकाणी एक्सप्रेस फिडरची वीज जोडणी केल्याने कनेक्शन खंडीत होत आहे. वास्तविक पाहता यावल नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून एक्सप्रेस फिडर उभारले आहे. वारंवार या दोषाबाबत तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी वीज कंपनीच्या कारभाराविरोधात ठिय्या आंदोलनाचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.





