किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत वित्त आयोगाच्या निधीतून खरेदी केलेले साहित्य गायब !


In Kingaon Budruk Village Panchayat, materials purchased with the funds of the Finance Commission are missing! यावल (14 ऑगस्ट 2024) : यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतीने वित्त आयोगाच्या निधीतून साहित्य खरेदी केले होते. तब्बल 10 लाखांचे साहित्य गायब झाले आहे. नुकतेच येथे सरपंच निवड झाली व भारती पाटील यांनी सरपंच पद स्विकारल्यानंतर पाहणीत हा प्रकार निदर्शनास आला. त्यांच्यासह सदस्यांच्या स्वाक्षरीने पंचायत समितीत मंगळवारी अर्ज देत साहित्या संदर्भात चौकशीची मागणी करण्यात आली.

पंचायत समिती प्रशासनाकडे चौकशीची मागणी
किनगाव बुद्रुक, ता.यावल येथील ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकार्‍यांने 15 वा वित्त आयोगाचा निधी खर्च केला परंतु खर्च केलेल्या निधीतून खरेदी केलेल्या अंदाजे 10 लाख रुपयांच्या वस्तू प्रत्यक्ष ठिकाणी नसल्याचे नव्याने सरपंचपद स्विकारलेल्या भारती पाटील यांना दिसून आल नाही. हे साहित्य व वस्तू कुठे आणि कोणाच्या सहकार्याने कुठे गेल्या आणि या संदर्भातील विषय नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी पूर्वीच झालेल्या सभेत नामंजूर केला होता. असे असतांना ग्रामसेवक यांनी साहित्य खरेदी केले व नंतर ते साहित्य ग्रामपंचायतीतून बेपत्ता झाले. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी लेखी तक्रार ग्रामपंचायत सरपंच भारती पाटील, उपसरपंच अल्लाबक्ष तडवीसह सर्व सदस्यांनी मंगळवारी यावल पंचायत समितीकडे केली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !