ऑक्टोंबर अखेरीस लागेल आचारसंहिता : जळगावात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार


Code of conduct to be implemented by the end of October : Deputy Chief Minister Ajitdada Pawar in Jalgaon जळगाव (14 ऑगस्ट 2024) : विधानसभा निवडणुकीसाठी ऑक्टोबर अखेर आचारसंहिता लागेल, असे महत्वपूर्ण विधान जळगावातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत महिला मेळाव्याचा प्रारंभ मंगळवारी जळगावमध्ये करण्यात आला. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वेळी उपस्थित होते. याप्रसंगी अजित पवार यांनी मार्गदर्शनात महायुतीला मतदान केले नाही तर पैसे परत घेतले जातील या आमदार रवी राणा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. हे विधान चुकीचे असून कोणीही हे पैसे परत घेऊ शकणार नाही, असे यावेळी अजितदादा म्हणाले.

राज्याच्या तिजोरीवर 2100 कोटींचा भार
राज्यातील सुमारे 1.40 कोटी महिलांना लाडक्या बहिण योजनेचा लाभ दिला जाणार असल्याने राज्याच्या तिजोरीवर दरमहा 2100 कोटी रुपयांचा भार पडणार आहे आणि ऑक्टोबर महिन्यातही या योजनेचे पैसे सरकारकडून दिले जातील, असे पवार म्हणाले. अजित पवार यांनी तर आचारसंहिता ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस लागेल, असे जाहीर केले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !