राज्यातील महायुतीचे नेते निष्क्रिय असल्यामुळेच प्रधानमंत्र्यांचा महाराष्ट्रात दौरा : खासदार सुप्रिया सुळे
Prime Minister’s visit to Maharashtra only because the leaders of the grand alliance in the state are inactive: MP Supriya Sule जळगाव (18 ऑगस्ट 2024) : एक देश एक निवडणुकीचा नारा देणारे सरकार महाराष्ट्रातील निवडणुका पुढे ढकलत आहे. याचा अर्थ सरकार डर रही है, कारण राज्यातील महायुतीचे नेते निष्क्रिय असल्यामुळेच प्रधानमंत्र्यांना महाराष्ट्रात यावे लागत आहे, असा खोचक टोला सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी राज्य सरकारला लगावला. जळगावच्या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात शनिवारी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा महिला महिला झाला. याप्रसंगी खासदार सुळे म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीआधी यांना लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी आठवले नाहीत मात्र तेव्हा त्यांनी पक्ष फोडा, घरे फोडा हेच उद्योग केले.
तर मंत्री झाले असते !
आपल्या आक्रमक शैलीत खासदार सुळे म्हणाल्या की, महिलांना सत्तेपेक्षा स्वाभिमान जास्त महत्वाचा असतो, मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्रीही झाले असते मात्र मी माझ्या 80 वर्षाच्या स्वाभिमानी वडिलांसोबत उभी राहिले याचा मला अभिमान आहे. दोन पक्ष फोडण्याचे देवेंद्र फडवणीस यांना कौतुक वाटत असेल तर ते दुर्दैवी आहे. मी पक्षाकडे खासदरकीचे तिकीट सोडून काहीही मागत नव्हते कारण संसदेत पहिला नंबर येत असल्यामुळे मी मेरिटवर खासदारकीचे तिकिट मागितले, तर तो गुन्हा आहे का?, असा सवाल त्यांनी केला.





न्यायालयातील लढाई नैतीकतेचीही
खासदार सुप्रिया म्हणाल्या की, सध्या न्यायालयातील लढाई केवळ पक्ष व चिन्हाची नाही तर ती नैतिीकतेची लढाई आहे. कारण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा घात करीत पक्ष व चिन्ह ओरबाडून घैण्यात आले. आता अनेकजण माफी मागत आहेत, पण माफी मागणार्यापेक्षा माफ करणारा हा मनाने मोठा असतो पण माफी मागणारे स्वतःची चूक मान्य करत असतील ते कोर्टातील केस मागे घेणार का? असा सवालही खासदार सुळे यांनी उपस्थित केला आहे.
