भुसावळमध्ये दावते इस्लामी हिंद जीएनआरएफतर्फे वृक्षारोपणासह रक्तदान शिबिर


भुसावळ (18 ऑगस्ट 2024)  : दावते इस्लामी हिंद सामाजिक व धार्मिक संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त मुलांची तिरंगा रॅली, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर घेण्यात आले. गुरुवारी सकाळी 10.30 वाजता अयान टॉवर ते अमरदीप चौकापासून मदरसतुल मदीनाच्या मुलांनी तिरंगा रॅली काढली. रॅलीद्वारे सर्वसामान्यांना देशभक्तीच्या संदेशासोबतच वृक्षरोपण करण्याचा संदेश देण्यात आला. रॅलीच्या शेवटी रझा टॉवर, मोहम्मद अली रोड, खडका रोडवर मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुन्नी जामा मशिदीजवळील, जाम मोहल्ला येथे दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत या शिबिराचे उद्घाटन भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राहुल तुकाराम वाघ यांच्याहस्ते करण्यात आले. 50 वर नागरिकांनी रक्तदान केले.


यांची कार्यक्रमास उपस्थिती
दावत इस्लामी हिंदचे राष्ट्रीय सदस्य हाजी सलीम अत्तारी, जिल्हाध्यक्ष जुबेर अत्तारी, शहराध्यक्ष शोएब अत्तारी, साबीर मणियार, अझहर कादरी, सईद अत्तारी, युसूफ खान, हाजी शाकीर कादरी, खालीद अत्तारी, अब्दुल मतीन अत्तारी, हाफिज कासीम यांचा सहभाग होता. कारी इद्रिस, कारी खालिद, हाफीज अकबर, मौलाना झुल्फकार मिसबाही, मौलाना साजिद हुसेन, फरीद शेख, अब्दुल वाहिद अत्तारी, दानिश कुरेशी, जीएनआरएफचे जिल्हाध्यक्ष रफिक रोशन कादरी आदींनी परिश्रम घेतले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !