दोन लाखांची लाच भोवली : धुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक जाळ्यात

एसीबीच्या कारवाईने लाचखोरांमध्ये प्रचंड घबराट


Bribe of two lakhs: In the network of superintendent of Dhule Secondary Education Officer office धुळे (20 ऑगस्ट 2024) : थकीत वेतन व सातव्या वेतन आयोगाचा हप्ता अदा करण्यासाठी दोन लाखांची लाच मागून ती स्वीकारताना धुळ्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक तथा भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या महिला अधीक्षक मीनाक्षी भाऊराव गिरी (41, अभियंता कॉलनी, वाडीभोकर रोड, गणपती मंदिराजवळ, धुळे मुळ रा.मु.पो.लोणी, ता.आर्णी, जि.यवतमाळ) यांना धुळे एसीबीने मंगळवारी सायंकाळी कार्यालयातच रंगेहाथ अटक केली. या कारवाईने शिक्षण क्षेत्रातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

असे आहे लाच प्रकरण
48 वर्षीय तक्रारदार व त्यांच्या पत्नी या धुळे महानगरपालिका हायस्कूलमध्ये विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहे. त्यांचे एप्रिल 2022 ते ऑक्टोंबर 2023 या कालावधीतील थकीत वेतन व सातव्या वेतन आयोगाचा 3 व 4 हप्ता महाराष्ट्र शासनाच्या निर्णयान्वये मंजूर झाला आहे मात्र थकीत वेतन तक्रारदार व त्यांच्या पत्नी यांना अदा करण्यासाठी आरोपी मीनाक्षी गिरी यांनी मंगळवारी दोन लाखांची लाच मागितली मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. सायंकाळी कार्यालयात लाच स्वीकारताच गिरी यांना अटक करण्यात आली.






यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, कॉन्स्टेबल प्रशांत बागुल, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !